• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2026

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; अनधिकृत कोचिंग क्लासेस व धोकादायक इमारतींवर कारवाईची मनविसेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; अनधिकृत कोचिंग क्लासेस व धोकादायक इमारतींवर कारवाईची मनविसेची मागणी

स्ट्रक्चरल ऑडिट, फायर एनओसी अनिवार्य करण्याची मागणी

१५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत, धोकादायक आणि स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या कोचिंग क्लासेस तसेच खासगी महाविद्यालयांच्या इमारतींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) नवी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. मनविसेचे शहराध्यक्ष संदेश डोंगरे यांनी अतिरिक्त आयुक्तांना लेखी निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शैक्षणिक संस्थांची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली.

नवी मुंबई हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहरात दाखल होतात. मात्र शहरातील अनेक जुन्या, जीर्ण आणि निवासी इमारतींमध्ये आवश्यक परवानग्यांशिवाय कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे समोर आले आहे. अनेक इमारतींचे अधिकृत स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसून, अग्निशमन यंत्रणा, फायर एनओसी आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांचाही अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काही ठिकाणी बेसमेंट आणि इमारतींच्या छतांवरही वर्ग भरवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील विविध शहरांमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनांचा धडा घेत नवी मुंबईत अशा घटना टाळण्यासाठी सर्व कोचिंग क्लासेस व खासगी महाविद्यालयांचे सुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच ज्या संस्थांकडे फायर एनओसी, हक्कपत्र किंवा अन्य आवश्यक परवानग्या उपलब्ध नाहीत, त्यांच्यावर त्वरित सीलिंगची कारवाई करावी. अधिकृत आणि सुरक्षित संस्थांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक रोखावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याबाबत पुढील १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष संदेश डोंगरे यांनी दिला. यावेळी उपशहराध्यक्ष प्रतीक खेडकर, प्रद्युमन हेगडे, श्रेयस शिंदे, ओंकार शेवाळे, मयंक घोरपडे आणि शुभम काळे उपस्थित होते.

Previous Post

शहर सुंदर ठेवणाऱ्या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी : महापौर सुजाताताई पाटील

Next Post

‘माणुसकीचाच खरा शिवराज्याभिषेक’! रायगडावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

Next Post
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'माणुसकीचाच खरा शिवराज्याभिषेक'! रायगडावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

घणसोलीतील दररोजच्या वाहतूक गोंधळावर मनसेचा आवाज

घणसोलीतील दररोजच्या वाहतूक गोंधळावर मनसेचा आवाज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com