• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2026

शहर सुंदर ठेवणाऱ्या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी : महापौर सुजाताताई पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शहर सुंदर ठेवणाऱ्या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी : महापौर सुजाताताई पाटील

नवी मुंबई : देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहराचे मानांकन असून या नावलौकिकात आपल्या स्वच्छताकर्मींचा सर्वात महत्वाचा वाटा असून त्यामध्ये कचरा वेचक महिलांचेही मोठे योगदान असल्याचे सांगत महापौर सुजाताताई पाटील यांनी संघर्षातून खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांचे कौतुक केले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित भारत सरकारच्या ‘नमस्ते (नॅशनल ॲक्शन फॉर मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम)’ योजनेंतर्गत नमुंमपा क्षेत्रातील अनपौचारिक कचरा वेचक (इन्फॉर्मल वेस्ट पिकर्स ) यांना पीपीई कीट, आयुष्मान भारत कार्ड आणि नमस्ते ओळखपत्र वितरण समारंभप्रसंगी महापौर सुजाताताई पाटील आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख प्रा.वृषाली मगदूम, मुख्य स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण उपस्थित होते.

स्त्री ही संघर्षातून अधिक ठामपणे उभी राहते हे कोरोना काळात प्रकर्षाने दिसून आले असून घर, संसार सांभाळून शहर स्वच्छतेसाठी दररोज आपले योगदान देणाऱ्या व त्यातही दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या भगिनींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे सांगत महापौर सुजाताताई पाटील यांनी शिक्षणासाठी वय नसते हे दाखवून देत तुम्ही इतरांना आदर्श वाटेल असे काम केले असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी झटणाऱ्या सुंदर हातांचा सन्मान करीत असल्याचा आनंद महापौरांनी व्यक्त केला.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांनी ‘नमस्ते’ योजनेंतर्गत अनपौचारिक कचरावेचकांची सुरक्षितता, आरोग्य व सन्मान याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. यादृष्टीने कचरा वेचकांचे प्रोफाईलींग हे परिसर सखी विकास संस्थेच्या वतीने करण्यात येत असून आत्तापर्यंत ९३० महिलांची नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी नमस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४४८ पीपीई किट्सचे वितरण आज करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच ई रिक्षा कचरा संकलन वाहन चालक महिला व दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कचरा वेचक महिलांचा सन्मानही आज होत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख प्रा.वृषाली मगदूम यांनी कचरावेचक महिलांकरिता करण्यात येत असलेल्या कामात अगदी सुरूवातीपासूनच नवी मुंबई महापालिकेचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. ५ झोपडपट्ट्यांमध्ये राबविण्यात येणारे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ हे देशभरातील आगळावेगळा उपक्रम म्हणून नावाजला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्ते योजनेमध्ये कचरावेचक महिलांचा समावेश करण्यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती देताना त्याला यश लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

परिसर सखी विकास संस्थेच्या प्रमुख रूक्मिणी पॉल यांनी स्वअनुभव कथन करीत नवी मुंबई महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून कचरा वेचक महिलांना जो सन्मान मिळतो त्यामुळे खूप आनंद वाटतो असे सांगितले.

याप्रसंगी नंदा घुले, आशामती शेंडगे, शशिकला कसबे, चंद्रकला जाधव, सावित्री सगणे, शोभा पालराज, लैलाबी शेख, लक्ष्मी कांबळे, दुर्गा गोहील, कौसाबाई चंदवाडे, शकुंतला घनघाव, स्वाती थडके, अनिता थोरात, मीरा जाधव, हनिफा शेख यांना प्रातिनिधिक स्वरूपात नमस्ते योजनेंतर्गत पीपीई किट व सामुग्री प्रदान करण्यात आली.

त्याचप्रमाणे यूएनडीपी योजनेंतर्गत प्राप्त दिघा, रबाळे, ऐरोली, घणसोली भागात चालणाऱ्या ई रिक्षा कचरा संकलन वाहन चालक रूक्मिणी पॉल, कविता कुडवे, राधा गुप्ता, सुनिता सुरवाडे, निकिता सोमवंशी, प्रतिक्षा कुडवे, सुनिता वाकळे, सुवर्णा कलाम व आनंदी कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला.

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ११ कचरा वेचक महिला यावर्षी दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या यशस्वी महिलांनाही महापौर सुजाताताई पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या आरंभीच्या सत्रात उपस्थित कचरावेचक महिलांनी चळवळीतील समुहगीते, प्रेरणादायी गीते व मनोगते सादर करून आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडविले.

Previous Post

मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

Next Post

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; अनधिकृत कोचिंग क्लासेस व धोकादायक इमारतींवर कारवाईची मनविसेची मागणी

Next Post
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; अनधिकृत कोचिंग क्लासेस व धोकादायक इमारतींवर कारवाईची मनविसेची मागणी

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; अनधिकृत कोचिंग क्लासेस व धोकादायक इमारतींवर कारवाईची मनविसेची मागणी

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'माणुसकीचाच खरा शिवराज्याभिषेक'! रायगडावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

घणसोलीतील दररोजच्या वाहतूक गोंधळावर मनसेचा आवाज

घणसोलीतील दररोजच्या वाहतूक गोंधळावर मनसेचा आवाज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com