• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, July 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 7, 2026

नेरुळ सेक्टर ४ मधील धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्तांकडे रविंद्र सावंत यांची मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ परिसरातील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील रस्त्यावर झुकलेल्या व ठिसूळ झालेल्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करून संभाव्य जीवित व वित्तहानी टाळावी, अशी मागणी शिवा पाम सोसायटीचे रहिवासी रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नेरूळ सेक्टर ४ मधील बहुतांश सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांनी सुमारे अडीच दशकांपूर्वी वृक्षारोपण केले होते. कालांतराने ही झाडे मोठी झाली असून त्यांच्या अनेक फांद्या सोसायटीच्या आवाराबाहेर रस्त्याच्या दिशेने झुकल्या आहेत. सोसायटीच्या आवारातील फांद्यांची छाटणी रहिवासी स्वतः करतात; मात्र रस्त्याच्या दिशेने उंच वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

या धोकादायक व ठिसूळ फांद्या पावसाळ्यात जोरदार वारा किंवा मुसळधार पावसामुळे तुटून रस्त्यावर किंवा वाहनांवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच शिवा पाम सोसायटी परिसरात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांचेही नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने सर्वेक्षण करून नेरूळ सेक्टर ४ मधील रस्त्यांवर झुकलेल्या तसेच धोकादायक स्थितीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

पाम बीच रोडलगतच्या वॉकिंग ट्रॅकवरील धोकादायक झाड हटविण्याची शिवसैनिक महादेव पवार यांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com