महापालिकेकडून– समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था
स्वयम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १८ मध्ये प्लॉट क्र. १४ येथील अर्थव सोसायटी मध्ये तिसऱ्या मजल्यावरील रूम नं. ३०२ चा स्लॅब सायंकाळी ५ वाजता कोसळून रूम नं. २०२ मध्ये पडलेला आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणास दुखापत झालेली नाही.
रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत रहिवाश्यांसाठी सेक्टर ५ कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सभागृहामध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली असून इमारतीचा वीजपुरवठा व पाण्याची लाईन खंडीत करण्यात आलेली आहे. सदर इमारत रहिवाशांना बाहेर काढून सील करण्यात आलेली असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केलेली आहेत. तरी नागरिकांनी या यादीतील धोकादायक इमारतींमधील तसेच राहण्यास धोकादायक वाटताहेत अशा इमारतींमधील रहिवास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची खबरदारी घेत थांबवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
