• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, July 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2026

प्रभाग २३ मध्ये तातडीने ब्लिचिंग पावडर व जंतुनाशक फवारणी करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पराभवानंतर माजी नगरसेविका सुनिता मांडवेंनी मानले मतदारांचे आभार

माजी नगरसेविका सुनिता मांडवे यांची आयुक्तांकडे मागणी
मुसळधार पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती; सोसायट्या, पदपथ, उद्याने, शाळा, नागरी आरोग्य केंद्रे आणि गटारांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक २३ मध्ये साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता नेरूळ सेक्टर ६, ८, १०, १६, १६-अ, कुकशेत गाव आणि सारसोळे गाव परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या, पदपथ, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालये, नागरी आरोग्य केंद्रे तसेच महापालिका शाळांच्या अंतर्गत व बाह्य परिसरात तातडीने ब्लिचिंग पावडरची फवारणी आणि जंतुनाशकांची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उशिरा सुरू झालेल्या पावसाने आता जोर पकडला असून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये पाणी साचणे, पदपथांवर शेवाळ साचणे आणि डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रोगराई पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, असे मांडवे यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक नियमितपणे महापालिकेला कर भरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही महापालिका प्रशासनाने स्वीकारावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सोसायट्यांच्या अंतर्गत आणि बाह्य परिसरात ब्लिचिंग पावडरची फवारणी केल्यास ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि इतर रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, प्रभाग २३ मधील ज्या ठिकाणी पाणी साचले आहे किंवा गटारांमध्ये सांडपाणी साचून राहिले आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने जंतुनाशके टाकून फवारणी करण्यात यावी. यामुळे डासांची उत्पत्ती रोखता येईल आणि साथीच्या आजारांचा फैलाव होण्यापासून प्रतिबंध करता येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने संबंधित विभागांना आदेश देऊन प्रभाग २३ मध्ये व्यापक स्वच्छता, ब्लिचिंग पावडरची फवारणी आणि जंतुनाशक फवारणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने महापालिका प्रशासन या मागणीवर किती वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाही करते, याकडे प्रभाग २३ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

पावसात झाडे का कोसळतात? नवी मुंबई महापालिकेचा शास्त्रीय शोध

Next Post

सानपाड्यात तातडीने आरोग्य शिबिरे व घराघरांत जनजागृती राबवा

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाड्यात तातडीने आरोग्य शिबिरे व घराघरांत जनजागृती राबवा

पराभवानंतर माजी नगरसेविका सुनिता मांडवेंनी मानले मतदारांचे आभार

प्रभाग २३ मध्ये तातडीने आरोग्य शिबिरे, घराघरांत सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com