• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, July 17, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2026

नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा पदभरतीसाठी सज्ज

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती २०२५-२०२६ अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील २० संवर्गातील १३२ पदांकरिता १९ हजार २२० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती २०२५-२०२६ अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील ६ संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा २१ व २२ जुलै २०२६ या कालावधीत ६ जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजिकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महापालिकेचे वर्ग १ श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महापालिकेचे २ अथवा ३ अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यात १ हजार ११२, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ हजार ५३५, मुंबई जिल्ह्यात ८ हजार १२३, नागपूर जिल्ह्यात ९४८, नाशिक जिल्ह्यात १ हजार ७८३ व पुणे जिल्ह्यात ४ हजार ४२९ अशा प्रकारे ६ जिल्ह्यात एकूण १८ हजार ९३० उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.

सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महापालिकेने सुरूवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १० जुलै २०२६ पासूनच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत, असे संदेश एसएमएस व ई मेलद्वारे पाठविण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रे घेऊन उमेदवारांनी आपल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती २०२५-२०२६ अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

सदर पदभरती परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यांचे तंतोतंत पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर नमूद वेळेवर उपस्थित राहावे, असे महापालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी, असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महापालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महापालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Previous Post

कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला

Next Post

पावसात झाडे का कोसळतात? नवी मुंबई महापालिकेचा शास्त्रीय शोध

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

पावसात झाडे का कोसळतात? नवी मुंबई महापालिकेचा शास्त्रीय शोध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com