• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, August 1, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2026

ओझरमध्ये शासनाच्या योजना थेट नागरिकांच्या दारी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
ओझरमध्ये शासनाच्या योजना थेट नागरिकांच्या दारी

महसूल शिबिरातून १,६४१ लाभार्थ्यांना सेवांचा लाभ

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : ओझर (ता. जुन्नर) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात एकूण १,६४१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ३१ जुलै) आयोजित या शिबिरात तालुक्यातील विविध शासकीय विभागांनी नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली, अशी माहिती तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली.

शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात महसूल, सामाजिक न्याय, शिक्षण, कृषी, परिवहन आदी विविध विभागांचे २२ माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना वृद्धापकाळ, विधवा व अपंग पेन्शन योजनांसह उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, आधार लिंकिंग आदी विविध सेवांचा लाभ देण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार रणजीत भोसले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच, तालुक्यातील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. चरण कोल्हे, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, सहायक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख, एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, नायब तहसीलदार सचिन मुंढे, संतोष भुजबळ, तुषार कोरडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

बेल्हेचा हरित संकल्प फुलला!

Next Post

‘आमचे पुन्हा माळीण होऊ देऊ नका…!’

Next Post
माळीणच्या राखेतून शासनाने धडा घेतलाच नाही!

'आमचे पुन्हा माळीण होऊ देऊ नका...!'

पीक विम्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पीक विम्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

माळशेज घाट : दरवर्षी बंद होणारा रस्ता नव्हे, तर जुन्नरच्या विकासाला लागलेला अडथळा

माळशेज घाट : दरवर्षी बंद होणारा रस्ता नव्हे, तर जुन्नरच्या विकासाला लागलेला अडथळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com