• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2026

मंगळागौर स्पर्धेत ३२ महिला समूहांचा उत्स्फूर्त सहभाग

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मंगळागौर स्पर्धेत ३२ महिला समूहांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

पारंपरिक संस्कृती, लोकनृत्य अन् खेळांचा रंग; वाशीतील प्राथमिक फेरीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत तब्बल ३२ महिला समूहांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पारंपरिक मंगळागौरीच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. सेक्टर ३, वाशी येथील महात्मा फुले स्मृती भवन येथे या स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली.

सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या प्राथमिक फेरीत सहभागी महिला समूहांनी पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य, पारंपरिक खेळ आणि मंगळागौरीशी निगडित विविध कलाप्रकारांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक समूहाला नियमानुसार किमान ८ ते कमाल १० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या निर्धारित वेळेत महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळविली.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिला समूहामध्ये किमान १० आणि कमाल १५ महिलांचा सहभाग होता. त्यामुळे महात्मा फुले स्मृती भवनाचा परिसर दिवसभर महिलांच्या उत्साहाने आणि पारंपरिक मंगळागौरीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सलुजा सुतार, नगरसेविका श्रीमती शशिकला पाटील तसेच समाजविकास उपआयुक्त प्रकाश कांबळे यांनी स्पर्धास्थळी आवर्जून उपस्थित राहून सहभागी महिला समूहांचे प्रोत्साहन केले. महिला सक्षमीकरणासोबतच पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

मंगळागौर ही महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा असून तिच्यामध्ये लोकनृत्य, पारंपरिक खेळ, गाणी आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. स्पर्धेतील महिला समूहांनी आपल्या सादरीकरणातून या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे अनेक समूहांनी पारंपरिकतेला आधुनिक सादरीकरणाची जोड देत परंपरा आणि नाविन्याचा सुरेख संगम साधला.

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राची लोकपरंपरा पोहोचविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली. सहभागी महिलांच्या उत्साहामुळे प्राथमिक फेरीला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.

Previous Post

नेरूळ पश्चिमेला अत्याधुनिक ग्रंथालय आणि ५० बेडचे रुग्णालय उभारण्याची मागणी

Next Post

ईद-ए-मिलादच्या महफिलसाठी प्रशासनाची ‘विशेष’ तयारी हवी!

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

ईद-ए-मिलादच्या महफिलसाठी प्रशासनाची ‘विशेष’ तयारी हवी!

७२९ कोटींच्या कचरा प्रकल्पावर ‘मर्सिडीज’चा आरोप!

७२९ कोटींच्या कचरा प्रकल्पावर ‘मर्सिडीज’चा आरोप!

राज्यात १.४० लाखांहून अधिक रिक्षा-टॅक्सी चालक मराठीत पास

राज्यात १.४० लाखांहून अधिक रिक्षा-टॅक्सी चालक मराठीत पास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com