• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2026

कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

adminbyadmin
in Uncategorized, महाराष्ट्र
0
कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

भाजपच्या प्रचार साहित्याचा खच

मोदींचे फोटो असलेले टी-शर्ट, झेंडे-टोप्यांनी राजकीय खळबळ

पुणे : एकीकडे ‘स्वच्छ भारत’ आणि स्वच्छतेचे संदेश देत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे कात्रज घाटात भाजपच्या प्रचार साहित्याचा अक्षरशः खच आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे झेंडे, प्रचाराच्या टोप्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट मोठ्या प्रमाणात उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘स्वच्छतेचे धडे देणाऱ्यांच्या प्रचार साहित्याची अवस्था अशी का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

कात्रज घाटातील मोकळ्या जागेत हजारो किलो वजनाचे बिनवापरलेले प्रचार साहित्य टाकण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, या साहित्यामध्ये भाजपच्या अधिकृत चिन्हांसह झेंडे, टोप्या आणि मोदींचे फोटो असलेले टी-शर्ट असल्याने हा प्रकार केवळ कचरा व्यवस्थापनाचा नसून राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंग यांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यांनी केवळ हा प्रकार समोर आणण्यापुरते न थांबता घटनास्थळी पडलेले साहित्य स्वतः गोळा करून परिसराची स्वच्छता केली. कात्रज घाटासारख्या निसर्गरम्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात प्रचार साहित्याची अशी विल्हेवाट लावणे हा बेजबाबदारपणा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

‘स्वच्छतेचा संदेश’ आणि घाटातील प्रचार कचरा?

राजकीय प्रचारासाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य तयार केले जाते. मात्र निवडणूक किंवा प्रचार संपल्यानंतर उरलेल्या साहित्याचे काय केले जाते, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. वापरात न आलेले साहित्य पुनर्वापरासाठी देण्याऐवजी थेट जंगल परिसरात किंवा मोकळ्या जागेत टाकले जात असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? संबंधित राजकीय पक्षाची, प्रचार यंत्रणेची की प्रशासनाची? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, पर्यावरणाचे रक्षण करावे आणि शहर स्वच्छ ठेवावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते. मात्र त्याचवेळी राजकीय पक्षाचेच प्रचार साहित्य पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात आढळून आल्याने स्वच्छतेच्या राजकारणावर विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

पालिका म्हणते ‘वनविभागाची हद्द’; वनविभागाकडून चौकशी

या प्रकाराबाबत महापालिका प्रशासनाने संबंधित जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले आहे. हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या घटनेत नेमके हे साहित्य कोणी आणून टाकले? एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रचार साहित्य कात्रज घाटापर्यंत कसे पोहोचले? ते कोणाच्या आदेशाने किंवा कोणाच्या देखरेखीखाली टाकण्यात आले? याची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

‘जबाबदारी कोणाची?’ हा खरा सवाल

कात्रज घाटात आढळलेल्या भाजपच्या प्रचार साहित्यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या राजकीय यंत्रणेकडूनच पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात प्रचार कचरा पोहोचला असेल, तर त्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. कात्रज घाटात सापडलेले झेंडे, टोप्या आणि मोदींच्या छायाचित्रांचे टी-शर्ट हा केवळ कचऱ्याचा ढीग नाही; तर राजकीय प्रचार, सार्वजनिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील विसंगतीचा आरसा ठरला आहे. आता वनविभागाच्या चौकशीतून या प्रचार साहित्यामागचे ‘हात’ आणि त्यामागची नेमकी कहाणी समोर येते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

Next Post

सौरऊर्जेच्या बोटींना चालना; जलवाहतुकीत महाराष्ट्राचा ‘ग्रीन’ मास्टरप्लॅन : नितेश राणे

Next Post
सौरऊर्जेच्या बोटींना चालना; जलवाहतुकीत महाराष्ट्राचा ‘ग्रीन’ मास्टरप्लॅन : नितेश राणे

सौरऊर्जेच्या बोटींना चालना; जलवाहतुकीत महाराष्ट्राचा ‘ग्रीन’ मास्टरप्लॅन : नितेश राणे

एनआयएच्या मोठ्या छापेमारीमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ

एनआयएच्या मोठ्या छापेमारीमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ

नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; सागरमाला २.० प्रकल्पांना केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; सागरमाला २.० प्रकल्पांना केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com