नवी मुंबई लाईव्ह न्यूज नेटवर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेरूळमध्ये त्यांना शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
नेरूळ सेक्टर दोन येथील दत्तात्रेय सोसायटीमधील कामगार नेते तसेच महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत
या प्रसंगी उपशहर प्रमुख अशोक मुंगसे, तुकाराम काळे, गजानन टाले, अण्णा म्हात्रे, संजय गुंजाळ, महादेव जोधोर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


