यंगस्टार मित्र मंडळाच्या वतीने उत्सवाचे आयोजन
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपा नेरूळ प्रभाग क्रमांक २३/२४ पुरुस्कृत यंगस्टार मित्र मंडळ आयोजित नानाची मानाची हंडी उत्सवाचे आयोजन नगरसेविका रुपाली किस्मत, नगरसेवक सचिन देवप्पा लवटे, समाजसेवक गणेश भगत यांच्या सौजन्याने २९ ऑगस्ट रोजी छत्रपति शिवाजी महाराज चौक सेक्टर -१८ येथे करण्यात आले होते. हा उत्सव बालगोपाळांच्या सहभागाने उत्साहात पार पडला.
नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई पाटील यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांच्या हस्ते टी-शर्ट चे अनावरण करून गोविंदा पथकास पुरस्कार देण्यात आले. श्री गणेश महिला पथक वडाळा आणि सारसोळकर गोविंदा पथक नेरुळ यांनी नानांची मानाची हंडी फोडली.
नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील ३५ पुरुष आणि १५ महिला गोविंदा पथकांनी यात सहभाग घेतला. गोविंदा पथकांनाच्या सुरक्षेसाठी अपोलो हॉस्पिटलची वैद्यकीय टीम उपस्थित होती. दही हंडी उत्सव साजरा करण्यासाठी यंगस्टार मंडळाच्या सर्व सदस्यानी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका स्वप्ना गावडे, नगरसेविका प्रिति भोपी, नगरसेवक गिरीश म्हात्रे, विमल गांडाळ, उषा सावंत, सायली परशेटे, कविता बारवे, समाजसेवक डी.डी. कोलते, बाबासाहेब रोकडे, तानाजी कडाले, संजय क़ुर्लेकर, देवप्पा लवटे, नाना घोगरे, प्रमोद भिडे, धनंजय गव्हाणे, अजय शिंदे, अशोक सकपाळ, विनय शेडगे, तुकाराम जूनघरे, संजय गुजर, विनोद चाळके, सुरेश परबलकर, अशोक पावडे, अरुण माईन, रामण रेड्डी, प्रतीक पाटोळे, दिलीप राऊत, दिपक पाटील, वासुदेव पाटील, शैलेश भोईर, रंगनाथ बारवे, गोरक्षनाथ गांडाळ, अरविंद जगदाळे, आनंद पवार, वैभव जाधव, संदीप पटकारे, राजू तुरे उपस्थित होते.