स्वयम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-१६ येथील छत्रपती संभाजीराजे उद्यानात नव्याने बसविण्यात आलेल्या ओपन जिम साहित्य व बेंचेसचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रभाग क्र. २३ (ब) मधील नागरिकांसाठी हा उपक्रम आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणारा ठरणार आहे.
नेरूळ प्रभाग समिती अध्यक्षा व भाजपच्या स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उद्यानात ओपन जिमची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे परिसरातील युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना खुल्या वातावरणात नियमित व्यायाम करण्याची सोय मिळणार आहे.
यावेळी बोलताना रुपाली भगत यांनी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य, व्यायामाची सवय आणि निरोगी जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांना सदैव प्राधान्य दिले जाईल.
उद्घाटनप्रसंगी समाजसेवक गणेश भगत, बाबासाहेब रोकडे, विष्णु वाडकर, रंगनाथ बारवे, आर. एम. पाटील, हिंदूराव लुगडे, रामदास कराळे, अंकुश साठे, सुधीर बाणखेले, महादू मोरे, तुकाराम जूनघरे, अजय शिंदे, विजय चांदणे, वासुदेव पाटील, दत्ताराम सावंत, गणपत जाधव, सावलेराम शिरसाठ, संदीप पाटील, दगडू सुडूलकर, रमेश सोनार, भालचंद्र वेदक, सुरेश चिपलूणकर, हरिश्चंद्र चिपलूणकर, अस्मिता म्हात्रे, संजीवनी तिरेवडेकर, तनु तिरेवडेकर, वैदेही जाधव, भारती जाधव, सुजाता बारवे, रीता विश्वकर्मा, सुनीता कारंडे, कल्पना सावंत, कृष्णाबाई गांडाळ, तानुबाई स्वाखंडे, स्वरूपबाई शिंदे, सागर मोहिते, अशोक गांडाळ, शुभम मोरे आणि रविंद्र भगत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ओपन जिम सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना व्यायामासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

