• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, September 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 27, 2026

तळोजात १० ऑक्टोबरला ‘ऑल महाराष्ट्र वुमेन्स कॉन्फरन्स २०२६’

adminbyadmin
in रायगड
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना एकत्र आणणारे व्यासपीठ

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

तळोजा : महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरण, सामाजिक संवाद आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी ‘ऑल महाराष्ट्र वुमेन्स कॉन्फरन्स २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष महिला परिषद १० ऑक्टोबर रोजी तळोजा फेज-१, रायगड येथे होणार आहे.

ऑल इंडिया वुमेन बोर्ड – महाराष्ट्र कोअर कमिटी आणि कोकण डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना या परिषदेत एकत्र आणण्यात येणार आहे.

या परिषदेत डॉक्टर्स, शिक्षक व प्राचार्य, व्यावसायिक, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या, महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत.

परिषदेदरम्यान गटचर्चा, संवाद सत्रे, अनुभवांची देवाणघेवाण, विचारमंथन आणि सामाजिक संवाद यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण विभागातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या अनुभवांना आणि विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

विविध व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि पार्श्वभूमी असलेल्या महिलांनी एकत्र येऊन आपल्या कार्याचा अनुभव मांडावा, एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि पुढील पिढीतील महिलांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ऑल इंडिया वुमेन बोर्डच्या महाराष्ट्र कोअर कमिटी व शूरा कोअर कमिटीच्या प्रभारी तसेच कोकण विभागाच्या गोवा प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासोबतच त्यांना परस्पर संवाद, विचारविनिमय आणि सामाजिक सहभागासाठी एक व्यापक व्यासपीठ मिळवून देणारी ही परिषद ठरणार असल्याचा दावा हाजी शाहनवाज खान यांनी केला आहे.

Previous Post

नेरूळच्या छत्रपती संभाजीराजे उद्यानात ओपन जिमचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com