• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, September 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2026

गणेशोत्सवातील निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गणेशोत्सवातील निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जुन्नर तालुक्यात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : गणेश विसर्जनानंतर नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होऊ नये आणि नदीपात्र स्वच्छ राहावे, या उद्देशाने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी निर्माल्य संकलनाचा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

नारायणगाव, वारूळवाडी, वडगाव कांदळी, पिंपळवंडी, उदापूर, येणेरे, येडगाव तसेच पिंपळगाव तर्फे नारायणगाव आदी ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केले. नारायणगाव व वारूळवाडी येथे सुमारे दीड टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे भाविक फुले, हार, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, कागद, कॅरीबॅग तसेच केळीचे खुंट आदी साहित्य नदीपात्रात सोडतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन दुर्गंधी निर्माण होते. जलप्रदूषणाचा मानवी जीवनासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी दिली.

संकलित केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रतिष्ठानचा मानस असून, या खताचा वापर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील झाडांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.

दरम्यान, पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे मीना नदीवरील पुलाजवळ गुंजाळवाडी व पिंपळगाव परिसरातील गणेशभक्तांसाठी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी गुंजाळवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद शेठ दरेकर यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमासाठी नारायणगाव येथे २५, तर वारूळवाडी येथे १५ श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. नदी स्वच्छता, जलप्रदूषण प्रतिबंध आणि निर्माल्याचा पुनर्वापर या त्रिसूत्रीमुळे या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

Previous Post

तळोजात १० ऑक्टोबरला ‘ऑल महाराष्ट्र वुमेन्स कॉन्फरन्स २०२६’

Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ

Next Post
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर

मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ

दुष्काळ कागदावर नाही, महाराष्ट्राच्या नसानसांत उतरतोय!

दुष्काळ कागदावर नाही, महाराष्ट्राच्या नसानसांत उतरतोय!

दुष्काळाच्या सावटात नवरात्राचा जल्लोष थांबणार!

दुष्काळाच्या सावटात नवरात्राचा जल्लोष थांबणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com