• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, September 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू काही आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी स्वरूपात उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे मतचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यामुळेच फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतला आहे.

मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात. राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करणे हाच सरकारचा जणू एकमेव कार्यक्रम झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याची उत्तरे आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे आहे.

राहुल गांधींच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त झालेली पिके आणि त्यांच्या कुटुंबांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हे सांगावे. हे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

Previous Post

गणेशोत्सवातील निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

दुष्काळ कागदावर नाही, महाराष्ट्राच्या नसानसांत उतरतोय!

Next Post
दुष्काळ कागदावर नाही, महाराष्ट्राच्या नसानसांत उतरतोय!

दुष्काळ कागदावर नाही, महाराष्ट्राच्या नसानसांत उतरतोय!

दुष्काळाच्या सावटात नवरात्राचा जल्लोष थांबणार!

दुष्काळाच्या सावटात नवरात्राचा जल्लोष थांबणार!

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर आणि टेम्पो दरीत कोसळले, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर आणि टेम्पो दरीत कोसळले, एकाचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com