• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2026

संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा महायुतीची दादरमध्ये पदयात्रा; मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

adminbyadmin
in मुंबई
0
संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा महायुतीची दादरमध्ये पदयात्रा; मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’चा नारा; घुसखोर आणि देशविरोधी शक्तींविरोधात एकजुटीचे आवाहन

मुंबई : ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषणेसह भाजपा महायुतीच्या वतीने दादर येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला. संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि देशाची एकता-अखंडता कायम राखण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या पदयात्रेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर टीका करत संविधान आणि देशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “ही लढाई संविधान विरुद्ध शरियाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान इंडिया आघाडीला मान्य नाही. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप त्यांनी केला.

घुसखोर आणि देशविरोधी शक्तींविरोधात सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, देशाची एकता, अखंडता आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीचा संदेश या पदयात्रेतून देण्यात यावा, असे आवाहनही राणे यांनी केले.

या पदयात्रेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपा महायुतीच्या या पदयात्रेतून लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून घुसखोरी, देशविरोधी शक्ती आणि विरोधकांच्या भूमिकेवर केलेल्या टीकेमुळे पदयात्रेत राजकीय मुद्द्यांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Previous Post

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष जनता दरबार !

Next Post

सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार; महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सज्ज !

Next Post
सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार; महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सज्ज !

सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार; महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सज्ज !

‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com