• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2026

सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार; महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सज्ज !

adminbyadmin
in मुंबई
0
सागरी क्षेत्रात ७६ हजार कोटींचे गुंतवणूक करार; महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सज्ज !

मुंबई वॉटर मेट्रोसह बंदर, जहाजबांधणी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना देणार – मंत्री नितेश राणे

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे आणि मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. राज्याच्या सागरी क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून, बंदरे, जहाजबांधणी, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी राज्यात उद्योग उभारून सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या वतीने गोरेगाव येथील नेस्को येथे २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित चौथ्या ‘मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपो’चे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी आणि भविष्यातील विकास योजनांची माहिती दिली. या परिषदेत नऊ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार आणि गुंतवणूकदारांसाठी ‘वन विंडो क्लिअरन्स’ सुविधेवर भर दिला जात आहे. बंदरांची क्षमता वाढविणे, जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती उद्योग विकसित करणे आणि निर्यात व लॉजिस्टिक्स क्षेत्राला गती देणे ही शासनाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे राणे यांनी सांगितले.

मुंबईतील जलवाहतुकीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो’सारख्या महत्त्वाकांक्षी संकल्पनांवरही काम करण्यात येत आहे. मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक व्यवस्था ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीतून उद्योगविस्तारासोबतच राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. भारताची सागरी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि राज्याला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा महायुतीची दादरमध्ये पदयात्रा; मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

Next Post

‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

Next Post
‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com