• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 5, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2026

अस्मितेच्या दिवाळी स्नेहसंमेलनात कार्यकर्त्यांचे विचारमंथन

adminbyadmin
in मुंबई
0
अस्मितेच्या दिवाळी स्नेहसंमेलनात कार्यकर्त्यांचे विचारमंथन

मुंबई : अस्मिता सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने अस्मिता भवन जोगेश्वरी पूर्व येथील माधव सभागृहात दिवाळीनिमित्त स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे वर्गणीदार, सभासद, हितचिंतक व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे सेवाकार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात अभिनेत्री, व्हॉइस आर्टिस्ट व कथाकथनकार सौ. स्मिता आपटे यांनी ‘फुलराणी’ आणि ‘न ऐकलेली कैकयी’ या कलाकृतींचे बहारदार सादरीकरण केले. व्हॉइस आर्टिस्ट व डबिंग क्षेत्रातील बदल, तंत्रज्ञानाची आव्हाने आणि मानवी कलेचे महत्त्व यावरही त्यांनी विचार मांडले. या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. रवी नत्थानी यांनी आगामी दहा वर्षांच्या वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संस्थेच्या सेवाकार्यात कोणते नवीन उपक्रम राबविता येतील, सध्याच्या कार्यात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या संस्थेच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना कोणत्याही परिस्थितीत संस्थेतील मातृभाषेतील शिक्षण बंद होणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती बागवे यांनी केले, तर श्रीमती शर्मिला सुरंगळीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष श्री. रवी नत्थानी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. दत्ता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मनोरंजनासोबतच संस्थेच्या भावी वाटचालीचे चिंतन, कार्यकर्त्यांमधील संघभावना आणि सेवाकार्याच्या विस्तारासाठी नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची प्रेरणा देणारे हे स्नेहसंमेलन ठरले

Previous Post

१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

Next Post
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

सीएसआरचा वापर की ठेवींचे राजकारण? विद्याधर अनास्कर यांनी आरबीआयचे दरवाजे ठोठावले!

सीएसआरचा वापर की ठेवींचे राजकारण? विद्याधर अनास्कर यांनी आरबीआयचे दरवाजे ठोठावले!

कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्नचा दिलासा

कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्नचा दिलासा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com