• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2026

एक करंजी लाख मोलाची’; स्वाधार संस्थेचा माणुसकीचा दिवाळी फराळ !

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एक करंजी लाख मोलाची’; स्वाधार संस्थेचा माणुसकीचा दिवाळी फराळ !

कुष्ठरोगग्रस्त, विकलांग रुग्ण आणि वारकरी विद्यार्थ्यांना फराळ, बेडशीट व मिठाईचे वाटप

दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचा जागर

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : स्वतःच्या घरात दिव्यांची रोषणाई करताना दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा, हीच खऱ्या दिवाळीची शिकवण आहे. याच सामाजिक संवेदनशीलतेतून स्वाधार सामाजिक संस्थेच्या वतीने ‘एक करंजी लाख मोलाची, संवेदना सामाजिक बांधिलकीची’ या संकल्पनेतून वंचित आणि गरजू घटकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कुष्ठरोगग्रस्त बांधव, विकलांग रुग्ण तसेच विश्वगुरू वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ, बेडशीट आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

स्वाधार सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षांपासून समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. दिवाळीसारखा आनंदाचा सण प्रत्येकाला सन्मानाने साजरा करता यावा, कोणताही घटक आनंदापासून वंचित राहू नये आणि गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमातून केवळ फराळाचे साहित्य वाटप न करता समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी, संवेदना आणि माणुसकीची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे सणांचा खरा आनंद आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत खांडगे म्हणाले की, “दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे. आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्याची दिवाळी गोड होत असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, हाच स्वाधार संस्थेचा संकल्प आहे.”

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, हितचिंतक आणि सहकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत खांडगे, निवृत्ती पवार, श्याम गर्जे, भाग्यश्री पवार, रमेश नरवडे, कोळेकर, सहदेव गर्जे, देवराज आदी सदस्य उपस्थित होते.

दिवाळीच्या फराळातील एका करंजीतून माणुसकीचा गोडवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा स्वाधार संस्थेचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.

Previous Post

मुश्रीफांची ‘फाईल बंद’; मोदी सरकारच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाचा पर्दाफाश !

Next Post

नवी मुंबईत महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेचा शिवमय जागर!

Next Post
नवी मुंबईत महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेचा शिवमय जागर!

नवी मुंबईत महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेचा शिवमय जागर!

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

फटाक्यांचा निष्काळजीपणा टाळा; सुरक्षित दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष मोहीम!

फटाक्यांचा निष्काळजीपणा टाळा; सुरक्षित दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष मोहीम!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com