ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि ठाण्याचे आमदार राजन विचारे हे नवी मुंबईतील पालिका प्रभाग ८१ आग्रोळी गावात आले असताना नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज रोहीदास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख रोहीदास पाटील आणि युवा सेनेचे वैभव नाईक उपस्थित होते.