नवी मुंबई : श्री गणेश कला,क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या वतीने प्रभाग क्रं ७७ नेरूळ येथे ‘‘पारंपारिक होळी सन उत्सवाचे’’ आयोजन केले होते, त्यानिमिताने समाजातील अत्याचार, स्त्री-भ्रूण, हत्या, रस्ते सुरक्षा इ. सामाजिक स्वरूपाच्या गंभीर प्रश्नावर जनजागृती करण्याचा प्रयत्न मंडळाने केला. तसेच या ठिकाणी भव्य दिव्य स्वरुपात ‘‘श्री गणेश मंदिर देखावा’’ थाटण्यात आला होता.
प्रभागातील ‘‘महिला भजनी मंडळ आणि बाल्या डान्स जुगल बंदीने’’ उपस्थितांचे मन जिंकले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश भगत, डी. डी. कोलते, संजय पाथरे, भोजमल पाटील, प्रदीप कलशेट्टी, विवेक पाटील, आनंद पवार, देवाप्पा लवटे, संभाजी पाटील, अशोक गांडाळ, डी.आर.शिंदे, लेंडे, संजय सकपाळ , प्रसन्ना थिटे, के.डी.भालके, नाना घोगरे, रंगनाथ बारवे, रमेश बोराटे, ज्ञानेश्वर इंगवले, सय्यद हरून, विष्णू देठे, दादा पवार, फंड, संतोष बोडके, प्रमोद प्रभू, एस.पी.गवस, परांजपे, विनेरकर, दत्ताराम गुंजाळ, उत्तेकर, पाटील, रुपेश यादव, सूर्या पात्रा, सागर मोहिते, संतोष दिघे, गणेश धान्द्रुथ, प्रतिक पाटोळे,आर.एम.पाटील, मराठे सर, सत्यवान घाडी,आशिष कदम, बाजीराव धुमाळ, भारत मोरे, रोहिदास खंडागळे, काशिनाथ डोके, रवींद्र गावंड, महादेव गर्जे, महेंद्र कनगुटकर, सागर आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.