अमोल शीरसागर
नवी मुंबई : शिवजंयतीच्या मुहूर्तावर ‘पारडं’ या मराठी चित्रपटांच्या पहिले प्रमोशन शिवसेनेचे युवा नेते वैभव नाईक यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. घणसोली सिम्पलेक्समधील माथाडी वसाहतीत झालेल्या या कार्यक्रमास वैभव नाईकांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक घागरे आणि शिवतेज मित्र मंडळ, घणसोली यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास चित्रपटातील सर्व कलावंत, रमेश कारे, डॉ. अनुरती घाणेकर, सरस्वती व्हरसेस वासंती मालिकेतील मंजुश्री, निर्माते पांडूरंग काळे, दिग्दर्शक विनय सोनवणे, रंगराव घागरे , प्रविण जाधव, अविनाश बडगुजर, विनय सोनवणे, अशोक हुंडे, अक्षया गुरव, अभिनेते शंकर शेडगे, देवा सरकटे, बबन चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती पांडूरंग काळे यांनी दिली.
शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने घणसोली कॉलनी परिसरात शिवजंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल बेंगडे, राजकुमार साबळे, अकुंश जगताप, कमलेश वाघमारे, तसेच माऊली कृप्पा सोसायटीतील पदाधिकारी आणि रहीवाशांनी परिश्रम केले.