‘महाराष्ट्र माझा प्रतिष्ठान’चा अभिनव उपक्रम
अमोल शीरसागर
नवी मुंबई : हुतात्मा भगत सिंग,हुतात्मा सुखदेव आणि हुतात्मा राजगुरू या तीन तरुण शहीद क्रांतीविराना रविवारी सांयकाळी सानपाडावासियांकडून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी सानपाडा विभागातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सानपाडा से-३ येथील बधाई स्वीट चौक येथे महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहीदांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हुतात्मा भगत सिंग,हुतात्मा सुखदेव आणि हुतात्मा राजगुरू या तीन तरुण शहीद क्रांतिवीरांच्या प्रतिमेला सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहीदांवर आधारित गाणी आणि भारत माता कि जय, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद यांसारख्या घोषणांनी बधाई स्वीट चौक क्रांतिमय झाला होता.यावेळी शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी सानपाडा विभागातील तरुण मंडळी,ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळीनी मोठी गर्दी केली होती.नवी मुंबईत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेेचे संस्थापक -अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, सुजित शिंदे, सा.सरकारराजचे संपादक संजय गुरव, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील, शहर चिटणीस गणेश पालवे, शहर सचिव विलास चव्हाण,बेलापूर विधानसभा सचिव मंगेश वाकचौरे, धनराज कदम, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणीस मनोज मेहेर, शिवसेना महिला आघाडी उपशहर संघठक विद्या पावगे, राष्ट्रवादीचे पोपट गोरडे, सुनिल चव्हाण आणि सानपाडा विभागातील ज्येष्ठ समाजसेवक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दि.२३ मार्च १९३१ साली हुतात्मा भगत सिंग,हुतात्मा सुखदेव आणि हुतात्मा राजगुरू या तीन तरुण शहीद क्रांतीविरानी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले होते. हा दिवस या शहीदांचा स्मरण दिवस म्हणून ओळखला जातो. ‘महाराष्ट्र माझा’ प्रतिष्ठानच्या वतीने या तीन शहिदांच्या बलिदानाची एक आठवण करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सानपाडा विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानने शहीद दिनानिमित्त हा चांगला कार्यक्रम आयोजित करून तरुणांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याचे मत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.तसेच हा उपक्रम प्रत्येक वर्षी न चुकता सुरु ठेवण्याच्या सूचनाही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केल्या. सानपाडा विभागाच्या इतिहासात शहिदांचा असा पहिलाच कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याने हा विषय सानपाडा विभागात एक चर्चेचा विषय बनला आहे. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र माझा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश शेटे, कार्याध्यक्ष विनोद हांडे, उपाध्यक्ष श्रीकांत आतकरी, असिफ खान, सचिव राहुल तनपुरे,उपसचिव राहुल माने,खजिनदार सुबोध गडेकर, उपखजिनदार राहुल कड, सदस्य देवेंद्र पिल्ले, सहोद खुटीकर, विवेक कदम, धनंजय मुंडे,अमन गोळे,ऋषिकेश कोरडे,ओमकार तोटकेकर,अजय निकम, विलास म्हात्रे, दिपक सावंत,अभिजित सूर्यवंशी,निलेश कड,तुषार अहिरे, मयूर मुळे, योगेश खांडगे, पराग कदम, रवी झेंडे, अक्षय गाढवे,अक्षय सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली.