सुजित शिंदे (९८६९२३६४४४)
नवी मुंबई : देशाच्या कानाकोपर्यात राजकीय उधानाला जोर आला असून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांनी देशातील गरीबीदेखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात ठाणे लोकसभा मतदारसंघ हा राजकारणातील बहूचर्चित मतदारसंघांपैकीच एक आहे. ठाणे मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढण्यास शिवसेनेची जय्यत तयारी आहे, तर दुसरीकडे हा मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी एनसीपीदेखील तेवढीच आक्रमक आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील कानोसा घेतला असता, एनसीपीच्या संघातील संजीव नाईक युवराजसिंग, संदीप नाईक हे विराट कोहली तर ना. गणेश नाईक हे धोनी असल्याचे वक्तव्य एनसीपीमधील मंडळीच नाही तर विरोधी पक्षातील मंडळीदेखील खासगीत करू लागली आहे.
निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबईचा कानाकोपरा ना. गणेश नाईक पिंजून काढत आहेत, तर ठाण्यामध्ये संजीव नाईक ठाण मांडून बसले आहेत. नवी मुंबई, भाईंदर आणि ठाण्यातील पडद्यामागील गणिते खेळण्यात, रणनीती ठरविण्यात आणि व्यूहरचना ठरविण्यात आमदार संदीप नाईक व्यस्त आहेत. नवी मुंबईतील तळागाळातील श्रमिकांमध्ये, बहूजन वर्गामध्ये संदीप नाईक कमालीचे लोकप्रिय असून त्यांचा चाहता वर्गदेखील ठिकठिकाणी विखुरलेला आहे. शिवसेना, मनसे आणि आपला गणेश नाईक, संजीव नाईक यांच्या तुलनेत सर्वाधिक धोका असणार तो संदीप नाईक यांच्याकडूनच.
नवी मुंबई विकसित करण्यास सिडकोने १९६८-६९पासून सुरूवात केली. परंतु त्यानंतरच्या ४६ वर्षात नवी मुंबई पट्टीमधील राजकारणात अनेक रथी-महारथी आले आणि गेलेही. तथापि नवी मुंबईचा सर्वाधिक कानाकोपरा पायाखाली पिंजून काढला तो केवळ आणि केवळ आ. संदीप नाईकांनीच. नालेसफाईच्या कामातील व पावसाळीपूर्व कामातील गांभीर्य जाणले केवळ संदीप नाईकांनीच. त्यामुळे सभापती आपल्या अंगणात ही मोहीम राबविताना पावसाळीपूर्व कामांचे महत्व त्यांनी नगरसेवकांसह पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
२००७साली ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच मुसळधार पाऊसाचे त्राहीमाम करून सोडले होते. ३ ऑगस्ट २००७ला वाशीतील नाले तुंबून पाणी रस्त्यावर आले होते. पालिका प्रशासनही हतबल झाले होते. अशावेळी वाशी सेक्टर १७मध्ये विश्वज्योती हॉटेलसमोरील एसएससी बोर्ड कार्यालयाजवळील नाल्यात स्वत: कमरेएवढ्या आणि त्यानंतर मानेपर्यतच्या पाण्यात घुसून या ओबाने नालेसफाई केली. या गोष्टीला एनसीपीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि सानपाडा-पामबीच भागातील मनसेचे पदाधिकारीही साक्षीदार आहेत.
महाराष्ट्रातील आमदारांमध्ये जे आमदार मतदारांशी सतत संपर्क ठेवतात, मतदारसंघ पायपीटीने पिंजून काढतात, त्यामध्येदेखील संदीप नाईकांचा वरचा क्रमांक आहे. आमदार आपल्या प्रभागात हे अभियान राबवुन ओबामाने आपली घरटी संपर्क कायम ठेवला आहे. सध्या नवी मुंबईत ना. गणेश नाईक आपल्या संपर्क अभियानातून मतदारांना आकर्षित करत आहेत, संजीव नाईकांनी ठाण्यातच शड्डू ठोकला आहे. सागर नाईक आपल्यापरिने परिश्रमाची शिकस्त करत आहेत. पण तरीही नवी मुंबईतील राजकारण्यांना सर्वाधिक धास्ती केवळ संदीप नाईकांचीच असल्याचे पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे.
जे गणेश नाईक करणार नाहीत, संजीव नाईक विचारही करू शकणार नाहीत, ती राजकीय कामे संदीप नाईक लीलया करू शकतात, असा विश्वास खुद्द विरोधकांच्या छावणीतून व्यक्त केला जावू लागल्याने लोकसभा निवडणूकीच्या टप्प्यात संदीप नाईकांवरच विरोधकांचे लक्ष केंद्रीत होण्याची दाट शक्यता आहे. संदीप नाईक पाहतात एकीकडे आणि विचार दुसरीकडेच सुरू असतात. जे संदीप नाईकांना जाणतात, ते संभाषण करताना संदीप नाईकांच्या नजरेवर आणि देहबोलीवरच लक्ष ठेवून असतात.
विरोधकांना कधी संदीप नाईक आपलेसे करतील, हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही समजणार नाही. विराट कोहलीचा आक्रमकपणा हा संदीप नाईकांच्या राजकारणाप्रमाणे आहे. संदीप नाईक हे कोणत्याही विरोधकाला आपलेसे करण्याची क्षमता ठेवून आहेत. ठाणे शहरातील तीनही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असल्याने व ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असल्याने या तीनही मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयास सुरू आहेत. नवी मुंबईचा एकखांबी तंबू गणेश नाईक एनसीपीसाठी आक्रमकपणे सांभाळत आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या टप्प्यात १० एप्रिलनंतर सुरू होणार्या निर्णायक समीकरणामध्ये आमदार संदीप नाईकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी-रहीवाशी, महिला मंडळे, भजनी मंडळे, दिंडीकरी, महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते, जनाधार फिरविण्याची क्षमता असणारे विरोधी पक्षाचे नगरसेवक आदी सांभाळण्याची ताकद संदीप नाईकांकडे असल्याने एनसीपीचा विराट कोहलीच विरोधकांच्या रडारवर असण्याची अधिक शक्यता आहे.