सुजित शिंदे -९८६९२३६४४४
नवी मुंबई :- घराजवळ पार्क केलेली पल्सर चोरीला जाण्याची घटना नेरूळ गावामध्ये बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेरूळ गावातील चांगा चौकानजीकच्या इमारतीत राहणारे महापालिकेचे सफाई खात्यातील कंत्राटी कामगार गुरूनाथ भोपी यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या घरानजिक आपली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (एमएच ४३/ टी ४८८८) पार्क केली. सकाळी कामावर जाण्यासाठी ते निघाले असता, त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेचे वृत्त कळताच नेरूळ कॉंग्रेसचे तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून भोपींना दिलासा दिला. नेरूळ परिसर मनोज मेहेर यांनी भोपींसमवेत पिंजून काढला. तथापि पल्सर कोठेही न आढळळ्याने मेहेर यांनी भोपी यांच्यासमवेत नेरूळ पोलीस ठाण्यात जावून दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली आहे.
नेरूळ सेक्टर ६-८ परिसरातही यापूर्वी मोठ्या संख्येने दुचाकी व चारचाकी वाहने चोरीला गेली असून पोलिसांना याचा छडा लावता आलेला नाही. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी गस्त वाढवून घरफोडी व चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवण्याची मागणी नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.