सुजित शिंदे (९८६९२३६४४४)
नवी मुंबई :- ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन विचारे मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना भेटणार असून याच दिवशी आ. विचारेंच्या प्रचाराची नवी मुंबईतील दिशा स्पष्ट होणार आहे.
सीबीडी-बेलापूर येथील के-स्टार हॉटेलमध्ये दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राजन विचारे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या पत्रकार परिषदेत नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंकडून एनसीपीवर आणि त्यांच्या नेतेमंडळीवर काय आणि कितपत टीका केली जाणार आहे, याकडे राजकीय घटकांचे लक्ष लागून राहीले आहे.