मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : रेल्वे प्रवाशांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देणारे खा. संजीव नाईक यांना ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेने पाठिंबा दर्शविला असून नाईक यांच्यासारखे अनुभवी, अभ्यासू आणि तरुण खासदारांना पुन्हा निवडून दिल्यास प्रवाशांचे उर्वरित प्रश्न सुटतील, असा विश्वास ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख यांनी खा. नाईक यांची भेट घेऊन त्यांना संस्थेच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. नाईक यांनी रेल्वे प्रवासी संघटना आणि खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांबरोबर नियमित संपर्क ठेवला. प्रवाशांबरोबर संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत.
नाईक यांच्या प्रयत्नाने ठाणे स्थानकाला नवा पादचारी पूल मिळाला, अबाल-वृध्द प्रवाशांसाठी सरकते जिने बसविण्यात आले. तिकीट खिडक्या वाढल्या एव्हिएम, एटीव्हिएम मशिनची संख्या वाढली, ठाणे कर्जत आणि ठाणे कसारा लोकलच्या फेर्या वाढविण्यासाठी खासदार नाईक यांनी सहकार्य केले, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. खा. नाईक यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले म्हणूनच आमची संस्था त्यांना पाठिंबा देत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील संस्थेचे सर्व सभासद खासदार नाईक यांचा विजय साकारण्यासाठी परिश्रम घेतील,असे देशमुख यांनी नमूद केले.