मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : नेरूळ पश्चिम नोडमध्ये शिवसेना नगरसेवक रतन मांडवेंचा प्रभाग गेल्या काही महिन्यापासून बहूचर्चित झाला आहे. हायमस्ट राजकारण करून शिवसेना नगरसेवक रतन मांडवेंची केलेली कोंडी हा विषय नेरूळ पश्चिमेला घराघरात माहिती झालेला विषय असून रतन मांंडवेसारख्या सरळ व साध्य माणसाची होत असलेली अडवणूक हा ज्याच्या त्याच्या तोंडी संतापाचा विषय बनला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रभागात घरटी प्रचार शिवसेना नगरसेवक रतन मांडवेंनी शुक्रवार सकाळपासून सुरू केला. यावेळी घरात असणार्या गृहीणींनी व पुरूषांनी नगरसेवक मांडवेंचे उत्स्फूर्त स्वागत करताना, ‘ साहेव, आम्ही तुम्हाला ओळखतो, कोणाला काय करायचे ते करू द्या, आमच्यासाठी तुम्हीच उमेदवार आहात,’ असे सांगत मांडवेंच्या कायार्र्ची पोचपावती दिली.
सध्या नेरूळ पश्चिमेला सेक्टर ८ परिसरात अंत्यत खालच्या स्तराचे राजकारण खेळले जात असून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. शिवसेना नगरसेवक रतन मांडवेंच्या प्रभागात शिवसेनेला दणदणीत आघाडी मिळण्याची शक्यता गृहीत धरून सभोवतालच्या विरोधी पक्षातील नगरसेवकांसह पालिका मुख्यालयातील सातव्या मजल्यावरील जबाबदार पदाधिकार्यांनीदेखील गेल्या काही दिवसांपासून मांडवेंच्या प्रभागातच मुक्काम ठोकल्याचे पहावयास मिळत आहे. गेली ४ वर्षे मांडवेंच्या प्रभागात न फिरकलेल्या पालिकेच्या सातव्या मजल्यावरील युवा पदाधिकार्यांला अचानक निवडणूकांच्या पार्श्वभभूमीवर मांडवेंच्या प्रभागातील मतदारांचा पुळका कसा निर्माण झाला असा प्रश्न खुद्द मतदारच उपस्थित करू लागले आहेत.
एल मार्केटजवळील एका रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रूग्णांंची देयकेे न सांगण्याचे निर्देश रूग्णालय व्यवस्थापणाला दिले जातात, कोणत्या सोसायटीत निवडणूका झाल्यावर पेव्हरर ब्लॉक टाकण्याचे तर कोणा एका माथाडींच्या सोसायटीला संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन मांडवेंच्या प्रभागात विरोधकांकडून दिले जात आहे. ही सर्व नौंटकी मांडवेंच्या कामाची पोचपावती आहे, चार वर्षे सेक्टर ८चे नागरिक कधी यांना दिसले नाहीत, आजच त्यांना मांडवेंच्या प्रभागाचा पुळका का आला, यापूर्वी कधी कोणत्या रूग्णाला भेटलेे नाही, त्याचे बिल भरले नाही, पेव्हर ब्लॉॅक आणि संरक्षक भिंत चार वर्षात दिसली नाही. मांडवेंची अडवणूक करण्यासाठीच इतका प्रेमाचा पुळका आला नाही. ४ वर्षात न फिरणारे चार महिन्यात ४० पेक्षा अधिक वेळा प्रभागात उगवले असल्याची उपहासात्मक चचार्र् नेरूळ सेक्टर ८ मधील महिला व पुरूषांंकडून केेली जात आहेे.
शुक्रवारी सकाळी शिवसेना नगररसेवक रतन मांंडवे , त्यांच्या पत्नी सौ. सुनिता मांडवे हे काही शिवसैनिकांसह घरटी प्रचारासाठी प्रभागात फिरू लागले. सिडकोच्या शिवनेरी सोसायटीत घरटी प्रचारासाठी सुरूवात केली असता सोसायटीतील महिला-पुरूषांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. साहेब, तुम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक असतानाही प्रभागासाठी खूप काही केल्याचे जवळून पाहिलेे आहे. आपल्या प्रभागासाठी तुम्ही मंजूर केलेल्या, वर्क ऑर्डर काढलेल्या हायमस्टच्याबाबतीत कोणी दळभद्री दबावाचे राजकारण करत आहे हे आम्ही वर्तमानपत्रात व फेसबुकवर वाचले आहे. पालिकेतही चौकशी केली आहे. ज्यांनी हायमस्ट अडविण्याचा दळभद्रीपणा केला, तेच आज रूग्णालयाची बिले भरण्याचा, फेव्हर ब्लॉक व संरक्षक भिंत बांधून देण्याचा तमाशा करत आहेे. हे काय आणि कशासाठी चालले आहे, ते आम्हाला माहिती नाही. चार वर्षात पुळका आला नाही, सेक्टर आठला यांच्या गाड्या कधी फिरल्या नाहीत, ते आज इथे मुक्काम कशासाठी ठोकून आहेत, हे आम्हा सवार्र्ंना माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्यासोबतच आहोत असे मतदारांनी उघडपणे मांडवे दांपत्याला सांगितले.
काही महिलांनी तर मांडवेंना अहो, निवडणूकीत आलेले हे ढग आहेत, निवडणूका संपल्यावर निघून जातील,४ वर्षात यांना कधी हा परिसर दिसला नाही आणि आज या परिसरातील समस्या सोडविण्याचा ढोंगीपणा करत आहेत. मांडवेंनी खूप कामेे केली आहेत,, नोकर्या दिल्या आहेत, शाळा-कॉलेजची ऍडमिशसन करून दिली आहेत, वेळी-अवेळी मदतीला धावून आले आहेत असे सांगत आम्ही आमच्यातच उठणार्या-बसणार्या मांंडवेंच्याच पक्षाला मत देणार असल्याचे यावेळी उघडपणे मांडवेंना सांंगितलेे.
नारायण पाटील, स्नेहा पालकर,, दिलीप घोडेकर, रंगनाथ औटी, इंदूमती भगत, सतीश रामाणे यांच्या प्रभागातील आजारी माणसे पालिकेच्या सातव्या मजल्यावरील पदाधिकार्याला दिसत नाही काय? मांडवेंच्या प्रभागातील रूग्णालयात आजारी असलेल्या माणसांचा अचानक पुळका येवू बिल भरण्याचा दानशूरपणा यांच्यात अचानक जागा झाला काय, असा प्रश्न साईबाबा हॉटेल चौकात उभ्या असणार्या काही मतदारांनी केला. नगरसेवक मांंडवेंना तर काही महिला मतदारांनी तर साहेब, आम्ही तुम्हाला ओळखतो, आमच्यासाठी तुम्हीच उमेदवार असल्याचे उघडपणे सांगितले.