नवी मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या २३व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून घणसोलीत कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सौ. शोभा दिपक पाटील व कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या आरोग्य पत्राचे घणसोलीत वितरण केले.
घणसोलीतील ५०० हून अधिक नागरिकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या आरोग्य पत्राचे या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्त्या व कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. निला लिमये, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश नायडू, यादव तसेच ब्लॉक अध्यक्ष सुरेश शिंदे, घणसोली देवस्थान संस्थेचे उपाध्यक्ष रोहीदास पाटील, ऐरोली विधानसभा युवक कॉंग्रेसचे सरचिटणिस अभिषेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वंदना चिंचोलकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्तविक दिपक पाटील यांनी केले. नगरसेविका सौ. शोभा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.