* या बैठकीस माजी खासदार संजीव नाईकही उपस्थित राहणार
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सिडको प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या महत्वपूर्ण समस्या मार्गी लावण्यासाठी नवी मुंबईचे ओबामा म्हणून उभ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे २६ मे रोजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेणार आहेत.
२६ मे रोजी सिबीडी बेलापूर येथील सिडको भवनात सकाळी १० वाजता ही बैठक होणार असून या बैठकीस आमदार संदीप नाईकांसमवेत ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईकही उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई शहराचा कारभार नवी मुंबई महापालिका प्रशासन हाकत असले तरी सिडको प्रशासनाकडील अनेक महत्वपूर्ण भुखंडाचे अद्यापि महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण झालेले नाही. संदीप नाईकांच्या ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रातील घणसोली नोडच्या हस्तांतरणावरून सिडको-महापालिकेतील तु-तु, मै-मैवरून वादंग होत असल्याचा नाहक स्थानिक रहीवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या तिसर्या सभागृहात २००५ साली प्रवेश केल्यापासून महापालिका स्तरावर तसेच ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणूकीत आमदार झाल्यावर मंत्रालयीन पातळीवरून सिडको दरबारी सातत्याने संदीप नाईक सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. आमदार संदीप नाईकांच्या पाठपुराव्यामुळेच सिडको दरबारी समस्यांचे भिजत पडलेले घोंगडे लवकर मार्गी लागणार असल्याचा आशावाद नवी मुंबईकरांकडून व्यक्त केला जात आहे.