योगेश शेटे
नवी मुंबई : श्री शनैश्वर जयंतीच्या निमित्ताने कुकशेत गावात २८ मे रोजी श्री शनि महाराजांच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ ते रात्रौ १० वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमत्रंक नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.
या सोहळ्यास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आदी सहभागी होत असून जय गजानन मित्र मंडळ वकुकशेत गावचे ग्रामस्थ, कुकशेतमधील महिला बचत गट, सुरज मित्र मंडळ आदींनी संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
कुकशेत गावातील नगरसेवक सुरज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा शनिभक्तांनी व नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.