छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फेसबुकवर विटंबना करणार्या समाज कंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक सानपाडा विभागाच्या वतीने तुर्भे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे करण्यात आली. यावेळी उपशहर अध्यक्ष योगेश शेटे,उपविभाग अध्यक्ष अमन गोळे,शाखा अध्यक्ष श्रीकांत आतकरी, शाखा अध्यक्ष राहुल तनपुरे, अक्षय जेधे,अमोल भिलारे, समीर कोंढाळकर, राहुल कड,अक्षय सूर्यवंशी,विकास बोंबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.