भाजपाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे अभ्यासू लढवय्ये नेते गोपीनाथ मुंडेंनी आपल्या उभ्या हयातीत सतत महाराष्ट्र हिताचाच विचार केला. गेली पाच वर्षे आम्ही संसदेत एकत्र काम केले. महाराष्ट्राबाबत त्यांचा अभ्यास दांडगा होता. समस्यांबाबत त्यांची कळकळ आणि आत्मियता उघडपणे पहावयास मिळायची. महाराष्ट्रातील समस्यांबाबत ज्यावेळी कॉंग्रेस आघाडीमधील केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा करायची वेळ यायची, त्यावेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गोपीनाथजींनी सतत सक्रिय योगदान दिले. सर्वसामान्य जनतेची नस ओळखणारा नेता आपण गमाविल्याची शोकप्रतिक्रिया माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी बोलताना व्यक्त केली आहे.