नवी मुंबई : महायुतीचे नेते,महाराष्ट्रातील भाजपाचा बुलंद आवाज गोपिनाथ मुंडे यांचे दिल्लीमध्येे मंगळवारी अपघाती निधन झाले. महाराष्ट्रातील एक बहुमोल नेता आपण गमावला. अशा शोकाकूल वातावरणात भाजपा शाखा क्र-६९च्यावतीने नेरूळ सेक्टर ६ परिसरातील भाजी मार्केटलगत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंना श्रध्दाजंली वाहण्यात आली.
मंगळवारी सांयकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भाजपा शाखा क्र-६९ चे वार्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल, जेष्ठ भाजपा कार्यकर्ते नारायण, शिवसेना शाखाप्रमुख विरेन्द्र लगाडे, नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर, अमोल मेहेर, हेमंत पोमन, बापु यादव, जाणता राजा मित्र मंडळाचे कार्यअध्यक्ष अजित खताळ व सर्व पदाधिकारी. तसेच सर्व युवा कार्यकर्ते दौलत चतुर ,सुरज पोटे, निलेश दौंडकर,पंकज पोळ ,प्रशांत सोळसकर, प्रशांत मढवी, प्रमोद सत्रे, प्रशांत थोरात, नवीन डोके .ऋषिकेश कदम,नितीन पाटील,प्रकाश केदार,समीर दाभोळे,अमोल चतुर, महेश जाधव,सुरज पोळ आदी सहभागी झाले होते.