नवी मुंबई : पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या जीवनधाराच्यावतीने मोफत दाखले वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला असून त्याचा १० जूनपासूनच शुभारंभ होत आहे. १० जुलैपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. उत्पन्नाचा दाखला आणि वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला हे दोन दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे दाखले विद्यार्थी आणि इतर सर्व नागरिकांसाठी शालेय प्रवेश तसेच इतर शासकीय कामांच्यावेळी आवश्यक असतात. जीवनधाराच्या या उपक्रमातून हे दाखले सहजरित्या उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
उत्पन्नाचा दाखला: सदर दाखल्यासाठी अर्जासोबत आणावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे- तलाठी पंचनामा, शिधापत्रिका/पासपोर्ट/ आधार कार्ड , पॅनकार्ड, चालू महिन्याचे वीज बिल किंवा मालमत्ता कर भरल्याची पावती, अर्जदाराचा एक फोटो (१ नंबर) व टेलिफोन नंबर आवश्यक आहे. वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला: या दाखल्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका/ पासपोर्ट/ आधार कार्ड, पॅनकार्ड, चालू महिन्याचे वीज बिल व मालमत्ता कर भरल्याची पावती, जर अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असेल तर महाराष्ट्रात सलग १० वर्षे रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक. अर्जदाराचा फोटो (१ नंबर) व टेलिफोन नंबर आवश्यक आहे. अर्ज भरताना सोबत कागदपत्रांची मूळप्रत असणे आवश्यक आहे.
दाखल्यांसाठी अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाईल क्रमांक ८८२८८४००००/ ८८२८८५००००.
अर्ज प्राप्त व अर्ज स्वीकृृती केंेंद्रे पुढुढीलप्रमाणे.े.
१) ऐेरोली : ब्लॅकस्मित टॉवर १, शॉप नं. ६, प्लॉट नं. १४, सेक्टर ६, ऐरोली. २) घणसोेली: निळकंठ, शॉप नं. ५, प्लॉट नं. ९, सेक्टर ३, घणसोली नवी मुंबई-४००७०१. ३) ३ कोेपरखैरणे : व्हाईट हाऊस. ४) बेलापूूरः शॉप नं.ः २, अ १/२, सेक्टरः २, सीबीडी, सुनिल गावसकर मैदानाजवळ.(८२८६८५८८८९). ५) नेेरुळः अष्टविनायक बिल्डिंग, तळ मजला, प्लॉट नं.ः ४०, सेक्टरः २०, मराठी शाळा, नेरुळ, नवी मुंबई.(९६१९९७७५७६). ६) वाशीः गणेश कृपा मित्रमंडळ कार्यालय, लोकमान्य टिळक मार्केट, सेक्टर १, वाशी. (९९६७८३३८८८, ९८९२५११७७०)
पूर्ण कागदपत्रांसहित अर्ज जमा केल्यानंतर ७ दिवसांनी संबंधित दाखला मिळेल, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.
* दाखले प्राप्तीसाठी आवश्यक प्रक्रिया
१) अर्ज प्राप्ती केंद्रांतून अर्ज प्राप्त करा
२) अर्ज पूर्ण काळजीपूर्वक भरावा
३) अर्जांसोबत नमूद कागदपत्रे जोडावीत
४) अर्ज भरताना मूळ कागदपत्रे सोबत आणावीत
५) पूर्ण भरलेला अर्ज स्वीकृती केंद्रात सादर करावा
६) ज्या अर्ज स्वीकृती केंद्रातून अर्ज प्राप्त केला आहे त्या केंद्रातून अर्ज भरल्यानंतर ७ दिवसांनी दाखला प्राप्त करावा
अधिक माहितीसाठी ८८२८८४०००० किंवा ८८२८८५०००० या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.