नवी मुंबई :- नवी मुंबईत वारंवार रोजगार मेळावे आयोजित करून बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यंदा रोजगार मेळावा कधी आयोजित करतात, याची बेरोजगारांना उत्सूकता लागून राहीली आहे. ऍड. गायखेंच्या एपीएमसीतील कार्यालयात त्याबाबत दररोज शेकडोच्या संख्येने बेरोजगार तरूणांकडून विचारणाही होत आहे.
गेल्या काही वर्षापासून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तर ओळखीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा एककलमी कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. गायखेंकडून सुरू आहे. गतवर्षी दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगारांना गायखे यांनी रोजगार मिळवून दिला असून विशेष म्हणजे हे युवक आजही गायखेंच्या संपर्कात आहे. लोकसभा निवडणूकीत आजारी असतानाही एमआयडीसी, रिक्षा संघटना, वृत्तपत्र विक्रेते, रोजगार मिळवून दिलेले हजारो घटक आदी माध्यमातून संपर्क प्रचार करताना गायखे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
दरवर्षी गायखेंकडून रोजगार मेळावा आयोजित होत असल्याने यावर्षी हा मेळावा कधी होणार याची बेरोजगारांना आतुरता आहे. याबाबत गायखे यांना संपर्क साधला असून नवी मुंबईतील किमान २५ हजार बेरोजगारांनी आपल्याशी संपर्क साधला असून नावनोंदणीही केली आहे. १२५ च्या आसपास कंपन्यांशी संपर्क साधला असून त्यांना अपेक्षित असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही कार्यान्वित केलेली आहे. लवकरच रोजगार मेळावा आयोजित करून बेरोजगारी र्निमूलनाची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे माहिती ऍड. गायखे यांनी दिली.
एमआयडीसीतील कामगार संघटना, शिक्षक संघटना, वृत्तपत्र विक्रेते, एपीएमसी बाजार आवारातील घटक, रोजगार मिळवून दिलेले हजारो घटक हा जनाधार ऍड. गायखे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून निर्माण केला असून येत्या विधानसभा निवडणूकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारीसाठी त्यांचा दावा प्रबळ असल्याची चर्चा आहे.