योगेश शेटे
नवी मुंबई :- नवी मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहचविण्याचे काम पालिका योजना विभागा मार्फत केले जाते. या विभागामार्फत नवी मुंबईतील पालिका हद्दीतील नागरिकांसाठी दरवर्षी योजना विभाग विविध योजना राबवीत असते . परंतु या योजनाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना अनेक ठिकाणी पायपीट करावी लागते .त्यामुळे नागरिकांचा पैसा व वेळेचे अपव्य अधिक प्रमाणात होते . यासाठी सध्याची कार्यप्रणाली जैसे थे ठेवून बेलापूर येथील मुख्यालयात लाभार्थींसाठी एक खिडकी पद्धत कार्यरत करावी अशी मागणी शिवसेना विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांच्या कडून केली जात आहे .
सध्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना योजनेच्या अर्ज प्रतीसाठी जवळच्या विभाग कार्यालयात अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जावे लागते .जर लाभार्थी नगरसेवकाच्या पक्षाशी सबंधित असेल तर ठीक अन्यथा अर्ज मागणी करणार्यास थेट अर्ज संपले असे ठेवणीतील उत्तर मिळते जरी अर्ज मागणारा लाभार्थी लोकप्रतिनिधी च्या पक्षाशी सबंधित असल्यावरही त्याला हि योजनेचा लाभ मिळेल असे नेहमीचे पठडीतील उत्तर दिले जाते .प्रत्येक विभाग कार्यालयास पालिके मार्फत प्रत्येकी दोन समूह संघटक नेमून दिले आहेत. ज्याचे काम विभागातील इच्छुक लाभार्थींला लाभ मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे .मात्र समूह संघटक ही नगरसेवकांच्या दावणीला बांधलेले आठलतात . लाभार्थाने गरज असलेला योजनेचा अर्ज योग्य कागद पत्रासह समूह संघटनाकडे भरून दिल्या वर या अर्जाची फेरतपासणी समाजसेवक ,सहाय्यक आयुक्त व शेवटी उपयुक्तांच्या मार्फत केली जाते. या सर्व प्रक्रियेस जवळपास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाभार्थींना सारख्या योजना विभागात चकरा माराव्या लागतात. योजना चा लाभ मिळावा यासाठी नागरिक देखील मारून मुटकून चकरा मारतात. यासाठी जर प्रशासनाने नवी मुंबईतील लाभार्थींचा त्रास वाचवा यासाठी पालिका मुख्यालयात एक खिडकी योजना सुरु करून लाभार्थींना दिलासा द्यावा अशी मागणी सरोज पाटील यांच्या कडून केली जात आहे. याबाबत लवकरच पालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले जाणार आहे.