नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभागाकडून गुरूवारी ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्या हस्ते नेरूळ एलपी शिवाजीनगर येथील १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनविसे सांस्कृतिकचे शहर चिटणीस गणेश पालवे,उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, मनविसेचे बेलापूर विधानसभा सचिव अंकुश सानप, मनसेचे माजी शाखा अध्यक्ष अर्जुन चव्हाण,मनविसे सांस्कृतिकचे उपविभाग अध्यक्ष सुबोध गडेकर, उपविभाग अध्यक्ष सचिन बाबर, शाखा अध्यक्ष संदीप दहिफळे,शाखा अध्यक्ष गणेश चव्हाण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नेरूळ एलपी शिवाजीनगर येथील गरीब घराण्यातील १२ वीच्या परीक्षेत चांगले गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्या हस्ते अभिनंदन पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच १२ वी नंतर महाविद्यालयातील पुढील प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांकडून डोनेशन मागणार्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांनी दिले.तसेच ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.