नवी मुंबई : विधानसभा निवडणूका अवघ्या तीन-चार महिन्यावर येवून ठेपलेल्या असतानाच नवी मुंबईत विधानसभा निवडणूकीने राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. ऐरोली मतदारसंघाच्या तुलनेत बेलापूर विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेच्या गडावर इच्छूकांची संख्या वाढतच चालली आहे. इच्छूकांमध्ये आयाराम-गयारामांची पार्श्वभूमी असलेल्यांचाही सहभाग असला तरी ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणूकीत निष्ठावंत आणि सक्रिय कार्यरत या निकषावर शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेंनाच उमेदवारी मिळणार असल्याचा आशावाद बाजार समिती आवारातील माथाडींकडून, सर्वसामान्य रिक्षाचालकांकडून आणि एमआयडीसीतील कामगारांकडून व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये नरेंद्र मोदी लाटेमुळे शिवसेनेला नवी मुंबईतून तब्बल ४७ हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्याने ऐरोली व बेलापूर विधानसभा आपण जिंकू शकतो असा विश्वास शिवसेनेमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच जागावाटपामध्ये नातूंकरीता गुहागरच्या बदल्यात बेलापूर भाजपा शिवसेनेला सोडण्याची शक्यता असल्याने बेलापूरमध्ये शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मोदी लाटेचा प्रभाव अजूनही कायम असून मतदारांमध्ये प्रस्थापितांविषयी असलेला जनप्रक्षोभ पाहता बेलापूरातून आमदार बनण्याची शिवसेनेमध्ये अनेकांची महत्वाकांक्षा प्रबळ होवू लागली आहे.
अनेक नावांची चर्चा होत असली तर नवी मुंबई कष्टकरी, श्रमिक वर्गामध्ये ऍड. गायखेंबाबत असलेला आदर पाहता या वर्गाकडून गायखेंच्या उमेदवारीविषयी पैजाही झडू लागल्या आहेत. ऍड. गायखे शिवसेनेत नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख असले तरी ते संघटनात्मक पातळीवर आपल्या कामाच्या बळावर मजल मारत आले आहेत. शिवसेनेत गायखेंनी कामगारक्षेत्रामध्ये अनेक वर्षे परिश्रम केले आहेत. स्थानिय लोकाधिकार समिती, विमा कर्मचारी सेना, शिक्षक, रिक्षा चालक, एमआयडीसीतील कामगार वर्ग, बाजार आवारातील श्रमिक वर्ग या तळागाळातल्या घटकांसाठी गायखेंनी गेल्या काही वर्षापासून भरीव कार्य करताना ग्रासलेवलच्या मतदारांमध्ये या माध्यमातून संघटना रूजविण्याचा प्रामाणिकपणे प्रयास केलेला आहे.
गायखेंनी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून बेरोजगारांच्या घरातील चुली पेटविण्याचा स्तुत्य जनकल्याणकारी उपक्रम राबविला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय व्ह्या, दफ्तरे, अन्य शालेय साहीत्य मोफत वितरीत करून त्यांच्या शैक्षणिक कार्याला योगदान देण्याचे काम केले आहे. श्रमिक वर्गामध्ये गायखेंची असलेली प्रतिमा पाहता गायखेंच्या उमेदवारीचा दावा प्रबळ मानला जात आहे.
संघटनात्मक पातळीवर गायखेंची सुरूवातीपासून संघटनेतील वाटचाल, आयाराम-गयारामचा लवलेशही नसणे, गेली अनेक वर्षे संघटनेसाठी खालेल्या खस्ता, श्रमिक वर्गाचा जनाधार आदी निकषावर अन्य इच्छूकांच्या तुलनेत गायखेंचे उमेदवारीसाठी दावा प्रबळ मानला जात आहे.