कॉंग्रेसच्या मनोज मेहेरांचा सत्ताधार्यांसह प्रशासनाला संतप्त सवाल
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील नागरी समस्या सोडविण्यासाठी तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधार्यांना सतत लेखी पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्यासह निवेदनाला पालिका प्रशासनासह सत्ताधारी केराची टोपली दाखवून नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशाची आणि सारसोळेच्या ग्रामस्थांचीच उपेक्षा केली आहे. तरीही मनोज मेहेर यांचा विभागाकरीता पाठपुरावा संपलेला नाही व मनोज मेहेरही परिश्रमाने थकलेला नाही, हे सोमवारी पुन्हा एकवार पालिका प्रशासनासह सत्ताधार्यांना जवळून पहावयास मिळाले.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील प्लॉट १५ वरील सिडकोची शिवम सोसायटी ते प्लॉट २०२ वरील सनसाईराज बिल्डींगदरम्यानच्या रस्त्याची तातडीने डागडूजी करण्यासाठी तसेच येथे साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्तांसह, शहर अभियंता, महापौर, उपमहापौर, नेरूळ विभाग अधिकारी आदी सर्वांना लेखी निमत्रंण दिले आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. समस्यांची पाहणी करण्याकरीता मागणी करूनही सारसोळे गावात सारसोळे गावात व नेरूळ सेक्टर सहा परिसरात पाहणी करण्यासाठी आजतागायत प्रशासनासह सत्ताधार्यांचे कोणीही आले नसल्याची नाराजी व्यक्त करून मनोज मेहेर निवेदनात पुढे म्हणाले की, नेरूळ सेक्टर सहा परिसरात प्लॅाट १५ वरील शिवम सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून अंबिका हाईट्स इमारतीलगतएक अंतर्गत रस्ता प्लॉट २०२ वरील सनसाईराज अपार्टंमेंटपर्यत जात आहे. शिवालिक सोसायटी ते रिक्षा स्टँडच्या रस्त्याला हा रस्ता शिवम सोसायटी ते अंबिका हाईट्स इमारतीलगत जोडला आहे. हा अर्ंतगत रस्ता मुख्य अंतर्गत रस्त्यापासून काही प्रमाणात खाली असल्याने पाऊसामध्ये शिवम सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भागात अंबिका हाईट्सलगत कचराकुंडीजवळ पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाणी जाण्यास मार्गच नसल्याने पाणी साचून तेथेच राहते. नवी मुंबई शहराचा विकास खाडीअर्ंतगत भागात झाला असून पावसाळ्यात डासांची घनता वाढते, हे आपणास माहिती असणारच. शिवम सोसायटीमध्ये डेंग्यूचे रूग्ण सापडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या कचराकुंडीलगत साचणार्या पावसाच्या पाण्यामुळे व तेथे डबकी तयार होवून डास अंडी घालण्याच्या शक्यतेने शिवम सोसायटी व अंबिका हाईट्समधील रहीवाशांना साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारास महापालिका प्रशासन व सत्ताधारी वर्गच जबाबदार असल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी निवेदनातून केला आहे.
प्रभागातील सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरामधील नागरी समस्या निवारणाबाबत व नागरी सुविधा मिळणेबाबत प्रशासनासह सत्ताधार्यांना सातत्याने शेकडोच्या नव्हे तर हजारोच्या संख्येने लेखी तक्रारी करूनही नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात विकासकामे होत नाहीत. समस्या जैसे थेच आहे. लेखी तक्रारपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. तक्रारपत्रांकडे कानाडोळा करून आपण सारसोळे गावच्या ग्रामस्थांसह नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे सांगून मनोज मेहेर यांनी नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील अर्ंतगत रस्त्याची व साचलेल्या पाण्याची पाहणी करण्यासाठी पाहणी अभियान तात्काळ राबविण्याची मागणी केली आहे.