नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सतत विक्रम करणार्या सानपाड्यातील माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल शाळेचा यंदाच्या वर्षीचा निकाल १०० % लागला.त्यामुळे शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
कु.तेजल अनिल शिंदे आणि कु.कावेरी धनाजी मिसाळ या दोन विद्यार्थीनीनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२.६० % गुण संपादन करून शाळेत पहिला येण्याचा मन पटकाविला.कु.प्रणाली हनुमंत बोरकर या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२.२० % गुण संपादन करून शाळेत दुसरा येण्याचा मन पटकाविला.तर कु.शिवानी शिवाजी कदम या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९१.२० % गुण मिळवत शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला.