नवी मुंबई : अच्छे दिनचे गाजर दाखवून जनतेवर प्रवासी रेल्ेल्वे तिकीट दरवाढीचा बोेजा लादणार्या विश्वासघातकी नरेंद्र मोदी सरकारचा राष्ट्रवादी कॉंँगे्रसच्या वतीने सर्वत्र जळजळीत निषेध करण्यात आला. ठाणे स्थानकात डॉ. संजीव गणेश नाईक, आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात जनआंदोलन करून रेल्वे प्रशासनाला भाडेवाढ मागे घेण्याचे निवेदन सादर केले. रेल्वे भाववाढ रद्द करा अन्यथा येत्या २५ जूनला रेल-रोको आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आहे. आंदोलकांनी मोदी सरकार हाय..हायच्या घोषणा दिल्या. मोदी सरकारने अवघ्या काही दिवसांतच सर्वसामान्य नागरिकांना भाडेवाढ करुन धक्काच दिला. रेल्वेच्या भाड्यात १४ टक्क्यांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वरील उभ्या असलेल्या लोकलवर चढून मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात प्रवाशांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोदी सरकारचा निषेध नोंदविला. मोदींनी अच्छे दिन आनेवाले है असे म्हणत लोकांची दिशाभूल केली, असा घणाघात डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केला.
लोकांनीही डोळे झाकून दिल्लीच्या सत्तेची चावी मोठ्या विेशासाने मोदींच्या हातात दिली. अच्छे दिन येण्याअगोदरच बुरे दिन आले आहेत. महागाई कमी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल अशी लोकांची अपेक्षा होती मात्र मोदी सरकारने सरसकट १४ टक्के रेल्वेची भाडेवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. हा जनतेचा विेशासघात आहे असे सांगून डॉ. नाईक म्हणाले की, या भाडेवाढीचा आम्ही निषेध नोंदवितो. ही अन्यायकारक झालेली भाडेवाढ येत्या काही दिवसांत रद्द केली नाही तर आम्ही जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाडेवाढ मागे घेण्यासाठी मोदी सरकारला २५ जूनची डेडलाईन राष्ट्रवादीने दिली आहे.