योगेश शेटे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ७७ नेरूळ आयोजित एज्युकेशन सेमिनार आणि विभागातील दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे, नगरसेवक सुरज पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये २७५ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच करिअर गाईडन्स दिनेश जंबेसरांनी विद्यार्थी व पालक यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे आयोजक गणेश भगत (बेलापूर विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष), डी. डी कोलते (‘ब’ प्रभाग समिती सदस्य ), संजय पाथरे(समाज सेवक)यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भोजमल पाटील, प्रदीप कलशेट्टी, संभाजी पाटील, अशोक गांडाळ, आनंद पवार, प्रसन्ना थिटे, नाना घोगरे, अनिता काद्वाडकर, संजय सकपाळ,विवेक पाटील,देवप्पा लवटे , संतोष दिघे, सागर मोहिते, सूर्या पात्रा, विष्णू देठे, पांडुरंग बेलापूरकर, शिवाजी पिंगळे, शांताराम मातेले, गोरक्षनाथ गांडाळ ,आर. एम. पाटील, आर. जी. मराठे , एस. पी. गवस, उत्तेकर, परांजपे, बाजीराव धुमाळ, काशिनाथ डोके, रमेश नलवडे ,पोपट काळे,महादेव गर्जे, पप्पू गर्जे ,अभिजित मोरे ,सत्यवान घाडी, रोहिदास खंडागळे ,महेंद्र कनगुटकर व सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.