नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सिवूड्स भागातील नगरसेविका कविता जाधव यांनी प्रभागातील विविध समस्यांच्या व विकास कामांकरीता महापालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड साहेब यांची बुधवारी भेट घेऊन सखोल चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांसमवेत पालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील,उपायुक्त परीमंडळ एकचे उपायुक्त सुभाष इंगळे , सह शहर अभियंता राव आणि कार्यकारी अभियंता संजय देसाई आदी अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी जनहिताची सर्व कामे हाती घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नगरसेविका कविता जाधव यांनी दिली.