– आमदार संदीप नाईक यांचे गौैरवोेद्गार
नवी मुंबई : आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक त्यांना खाजगी शाळेमध्ये दाखल करतात. मात्र नवी मुंबई पालिकेच्या शाळांचा दर्जाही खाजगी शाळांच्या तुलनेत अधिक पटीने चांगला असून हे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत दाखवून दिले आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात शहरातील खाजगी शाळांपेक्षा अधिक टक्केवारी मिळविली आहे, असे गौरवोद्गार आमदार संदीप नाईक यांनी काढले.
जुहूगाव येथील प्रभाग क्र.४५ चे नगरसेवक प्रभाकर भोईर यांनी पालिकेच्या शाळेतील १० वी व १२ वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनी आपले विचार मांडले.
आमदार निधीअंतर्गत जुहूगाव सेक्टर १९ मधील गावदेवी मैदानाच्या सुशोभिकरणाचा शुभारंभ देखील याप्रसंगी आमदार नाईक यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास माजी महापौर अंजनी भोईर, नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी सरपंच रघुनाथ भोईर, परिवहन समितीचे सदस्य रामनाथ भोईर, प्रल्हाद भोईर, लक्ष्मण पाटील, संजय भोईर, उत्तम भोईर, काटकर बुवा, कमलाकर पाटील, दत्तात्रय भगत, वैभव भोईर, नवनाथ भोईर, मोरेेशर भोईर, हरिश्चंद्र पाटील, नंदकुमार भगत, सुधाकर भगत यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आ. संदीप नाईक व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रामा नामा भोईर पालिका शाळेत शिकणार्या पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी पालिका शाळांमध्ये स्कूल व्हिजन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण दिले जाते. पालिकेच्या माध्यमातून पुस्तके, वह्या, गणवेश व इतर शालेयोपयोगी साहित्य मोफत पुरविले जाते.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी नवी मुंबई शहरातील खाजगी शाळांपेक्षा निकालाचीअधिक टक्केवारी प्राप्त केली आहे म्हणूनच जोपर्यंत पालक स्वतः आपल्या मुलांना पालिका शाळेत दाखल करीत नाहीत तोपर्यंत ना. गणेश नाईक यांचे स्कूल व्हिजन पूर्ण होणार नाही, असे मत त्यांनी मांडले. नगरसेवक प्रभाकर भोईर व माजी महापौर अंजनी भोईर यांच्या माध्यमातून जुहूगावातील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी अनेक विकास कामे झाली आहेत. आपल्या प्रभागातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळावे या उद्देशाने प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्यावतीने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते, असे सांगून आमदार नाईक यांनी या दोघांच्या कार्याचे कौतुक केले. रामा नामा भोईर शाळेमध्ये १० वीपर्यंत शिक्षणाची सोय करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महापौरांशी चर्चा करू, असे ओशासन त्यांनी यावेळी दिले.
नगरसेवक प्रभाकर भोईर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवत असताना आपल्या प्रभागातील गरीब विद्यार्थी हा पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता पालिका शाळेच्या माध्यमातून पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.
पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उत्तम गुण संपादित करून यशस्वी होत असल्याने आता नक्कीच पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करण्याऐवजी पालिका शाळेत दाखल करतील, असा आत्मविेशास त्यांनी व्यक्त केला.