कॉंग्रेसचे नेरूळ चिटणिस मनोज मेहेर यांनी दिला इशारा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस, एमएसईबीच्या डीपी प्रवेशद्वारालगत पदपथावरच असलेला कचर्याचा ढिगारा उचलण्यास पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. नेरूळ पालिका विभाग कार्यालयात विभाग अधिकार्यांकडे हा कचरा उचलण्याविषयी लेखी तक्रार करून आठवडा उलटला तरी विभाग अधिकारी कार्यवाही करत नाही. बुधवारपर्यत कचरा उचलला न गेल्यास गुरूवारी पालिका विभाग अधिकार्याच्या दालनातच हा कचरा नेवून टाकण्याचा इशारा नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी दिला आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये एक महिन्यापासून शिवम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस, एमएसईबीच्या डीपी प्रवेशद्वारालगत एक महिन्यापासून अधिक काळ कचर्याचा ढिगारा, झाडांच्या तुटलेल्या फांद्या हा कचर्याचा ढिगारा हा कचरा तसाच पडून आहे. कचरा हटविण्याबाबत पालिका प्रशासनाकडून सातत्याने चालढकलपणा केला जात आहे. पाऊस मुसळधार सुरू झाल्याने ढिगार्यातील कचरा इतरत्र रस्त्यावर विखुरला जावून गटारामध्ये जात आहे. हा कचरा रापल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली असल्याचे मनोज मेहेर यांनी म्हटले आहे.
हा कचरा हटविण्याबाबत पालिका अधिकार्यांना वेळावेळी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सांगण्यात आले आहे. पालिका नेरूळ विभाग कार्यालयात लेखी तक्रारही करण्यात आली आहे. या कचर्याची दुर्गंधी सुटून कचर्यातून काळे पाणी वाहत आहे. शिवम सोसायटीच्या आवारात असलेल्या साईमंदीरात आणि समोरील शिवालिका सोसायटीच्या रहीवाशांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यत पालिका प्रशासनाने हा कचरा उचलला न गेल्यास गुरूवारी स्थानिक रहीवाशांच्या माध्यमातूनच हा कचरा नेरूळ विभाग कार्यालयाच्या दालनात टाकण्याचा इशारा नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी दिला आहे.
गेली काही वर्षे सातत्याने लेखी तक्रारी, निवेदने पालिका मुख्यालयापासून ते थेट जनता दरबारात दिली आहे. यापुढे आक्रमकता दाखविल्याशिवाय नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावच्या नागरी समस्या सुटणार नसल्याची माहिती मनोज मेहेर यांनी दिली.