नवी मुंबई : भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिध्दांताचा खरा वेध घेणारे व्याख्यान म्हणजे ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ हे होय. अशोकपुष्प पब्लिकेशच्या वतीने मंगळवार, २२ जुलै २०१४ रोजी रात्री ८ वाजता वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे यशस्वी नेतृत्व, त्यासाठी लागणारे सुवर्ण नियम, जग जिंकून देणार्या व्यवस्थापन शास्त्रातील चौदा रत्नांसह इतर महत्वपूर्ण सिध्दांत सांगितले जाणार आहे.
प्रा. नामदेवराव जाधव यांचा गनिमी कावा, शिवराय, पानिपतचा विजय, खरा संभाजी, उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू या पुस्तकांची बेस्ट सेलर म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यत राजमाता प्रकाशनद्वारा प्रकाशित पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याचे कारण राजांवर असलेले प्रेम होय. आजसुध्दा शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने चाललेले यश आपलेच आहे . या व्याख्यानात उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक तसेच जीवनात मोठे ध्येय ठेवणार्या व्यक्तिंना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. या व्याख्यानाचा नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येेने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विष्णूदास भावेमध्ये प्रवेशिका उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९०२२७४४०४० या क्रमांकावर उन्मेष चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.