नवी मुंबई : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी सातत्याने सामाजिक कार्यक्रमाचा धडाका ठेवला असून त्यात सातत्यही ठेवल्याचे पहावयास मिळत आहे. ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून ऍड. गायखे यांनी नवी मुंबईतून यंदाच्या वर्षी शैक्षणिक गुणवत्ता मिळविलेल्या १ हजार विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव कार्यक्रमाचे आयोजन केेले आहे.
वाशीतील गुजराथ भवन हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला असून दहावी-बारावी-पदवीधर, अभियांत्रिकी-वैद्यकीय अशा नानाविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या नवी मुंबईतील एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने केेला जाणार आहे.गतमहिन्यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी रोजगार मेळावा आयोजित करून हजाराहून अधिक लोकांना त्याच दिवशी रोजगार मिळवून दिला होता. मेळावा संपल्यावरही महिन्याभराच्या कालावधीत २५० पेक्षा अधिक लोकांना ऍड. गायखे यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.