नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई शहराच्या मातीतून आजवर अनेक नाट्यकर्मी उदयास आले आहेत. कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी ऐरोलीकरांची आपल्याला हक्काचे स्वतंन्न नाट्यगृह असावे. अशी अनेक वर्षापासूनची मागणी आ. संदीप नाईक यांच्या यशस्वीप्रयत्नाने पूर्ण झाली आहे. आज (ता.२०) बुधवारी ऐरोली सेक्टर ५ येथे साकरणार्या सर्वसमावेशक नाट्यगृहाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपुजन करण्यात आले. यावेळी आ. नाईक यांनी ऐरोलीतील नाटयगृहामुळे ऐरोली नाटयसंस्कृती जपणारे शहर घडले असे गौरवोद्गार काढले.
शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करुन आमदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. ऐरोली येथील ध्येयपूर्ती अशा या नाट्यगृहाची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी पूर्ण केल्याबद्दल ऐरोलीकरांनी त्यांचे याप्रसंगी आभार मानले.
या कार्यक्रमाला उपमहापौर अशोक गावडे, सभागृह नेते अनंत सुतार, माजी उपमहपौर भरत नखाते, स्थानिक नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेविका विनयाताई मढवी, नगसेवक नविन गवते, नगसेवक अशोक पाटील, नगसेवक न्हानू तेली, नगसेवक सुरेश सालदार, नगसेवक बाळकृष्ण पाटील, नगसेवक प्रभाकर कांबळे, नगरसेविका अपर्णा गवते, नगरसेविका सुनंदा राऊत, नगसेविका शिल्पा मोरे, नगरसेविका शुभांगी सपकाळ, नगरसेविका हेमंागी सोनवणे, माजी नगरसेवक महादेव थोरात, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राष्ट्रवादी जिल्हा सदस्य जी.एस.पाटील, परिवहनचे माजी सभापती मुकेश गायकवाड, ठामपा प्रभाग ५४ चे नगरसेवक अक्षय ठाकूर, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनंत ठाकूर आदि मान्यवर प्रभाग समितीचे सदस्य नाट्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना संजीव नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आ. संदीप नाईक यांनी ऐरोली नाट्यगृहासाठी सिडको आणि शासनस्तरावर मागील काही कालावधी पासून केलेल्या पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. सिडकोने नवी मुंबईची घरे बांधताना त्यांना सुविधा पासून मात्र वंचित ठेवले. त्यांनतर स्थापित झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने या शहराची जडण घडण अतिशय सुंदरपणे अल्पवधीतच केली आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वच मान्यवर आणि लोकप्रतिनिधीचे या प्रसंगी विशेष कौतुक केले. ऐरोलकर नाट्यप्रेमी नागरिकांना नाटक पाहण्यासाठी वाशी किंवा ठाण्याला यापूर्वी जावे लागत असे. मात्र आता आपल्याच भुमीत प्रशस्त असे नाट्यगृह साकारले जाणार असल्याने यांची होणारी वणवण कमी होणार आहे. या नव्या नाट्यगृहामुळे नवी मुंबईचे एक वेगळी संस्कृती आगामी कालावधीत उदयास येईल, असा विश्वास डॉ. नाईक यंानी व्यक्त केला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीप नाईक आपल्या मार्गदर्शनात आपण सभापती असल्यापासून यासाठी केलेला पाठपूरावा त्याला आलेले यश याबद्दल आंनद व्यक्त केला. सिडकोने या नाट्यगृहाची निर्मिती करण्याची गरज होती. पंरतु नेहमीच सिडकोने नागरिकांना दुय्यम वागणुक दिली आहे. तर महापालिकेत विरोधकांनी नाट्यगृह होऊ नये यासाठी विरोध देखील केला होता. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी लोकहिताय भुमिका घेत या नाट्यगृहाची निर्मिती करण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाने आज याचे भुमिपूजन करण्यात असल्याचे सांगितले. आमदार निधीतून यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करुन ३० लाख रुपयांचा आमदार निधी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून सर्वसोयीसुविध पुर्ण असे हे नाटयगृह साकरणार असल्याचे आ. नाईक म्हणाले. कवि मोहन भोईर, लेखक रवि वाडकर, यासारखे नाटयकर्मी याच नाटयगृहातून घडतील असा विश्वास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला.
या कामी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक एम.के.मढवी व नगरसेविका विनयाताई मढवी यांचा विशेष सत्कार त्याचबरोबर ऐरोलीकर नाट्यदिग्दर्शक सुरेश लाड आणि निवोदित कलाकार पुजा रायबले यांचा देखील यथोचित सन्मान मान्यवरांनी केला.