नवी मुंबई : मनसेचे ठाणेजिल्हा संपर्क अध्यक्ष गिरीश दहाणूरकर यांनी वाशीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या उपस्थितीत मनसेची महिला कार्यकारिणी जाहीर केली आहे.
डॉ. आरती धुमाळ आणि अनिता नायडू यांची बेलापूर विधानसभा उपशहर अध्यक्षपदी तर प्रिया गोळे आणि शुभांगी बंदीछोडे यांची ऐरोली विधानसभा उपशहर अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कल्पना आहिरे, उज्ज्वला कृष्णन, सोनिया धानके, शुभांगी यादव, जयश्री जोंधळे, सुवर्णा भोसले, उज्ज्वला धुमाळ, शीला जाधव, स्मिता सोनवणे, शर्मिला भांडूगळे, तृप्ती सांळूके, सुरेखा म्हात्रे, यशोदा शिंदे यांची विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबईत महिला सेना मजबूत करून महिला सेनेच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयास विविध कार्यक्रमातून व आंदोलनातून करण्याचा संकल्प यावेळी महिला पदाधिकार्यांनी केला.
या नेमणूकाच्यावेळी मनसे शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व अन्य पदाधिकार्यांनी उपस्थित राहून महिला पदाधिकार्यांना त्यांच्या संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.